
मुंबई, २६ मार्च २०२५ – महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात डिजिटल क्रांती घडवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे.
आजच्या विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, नागरिकांना सरकारी सेवा सुलभतेने मिळाव्यात यासाठी ‘मेटा’ कंपनीसोबत करार करण्यात आला असून, लवकरच अनेक महत्त्वाच्या सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
Soonu Sood wife accdent / नागपुरमध्ये सोनू सूद यांच्या पत्नीचा अपघात, रुग्णालयात दाखल
या नवीन उपक्रमाचा मुख्य उद्देश दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार रोखणे हा आहे.
नागरिक आता व्हॉट्सअॅपवरूनच सरकारी सेवांचे शुल्क भरू शकणार आहेत. विशेष म्हणजे, सहकार विभागाच्या सर्व सेवा पुढील तीन महिन्यांत ऑनलाइन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी सांगितले की, प्रथम टप्प्यात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या सेवा ऑनलाइन केल्या जातील,
तर दुसऱ्या टप्प्यात त्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होतील. त्यांनी इशारा दिला की, जर कोणी जाणूनबुजून काम अडवण्याचा प्रयत्न केला, तर ‘डिजिटल फूट प्रिंट’ द्वारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी मजूर संस्थांमधील गैरव्यवहारांकडेही लक्ष वेधले.
ते म्हणाले, “मजूर संस्थांचे अध्यक्ष मर्सिडीज गाड्यांमधून फिरताना दिसत आहेत. या विसंगतीवर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कामगार विभाग अधिक कडक नियमावली तयार करणार आहे.”
Whatsap News : शिवाय, विभागीय चौकशीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. त्यांच्या मते, नवीन कार्यपद्धतीमुळे भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे अधिक जलद गतीने निकाली निघतील.