
AjitPawar:मुंबई: मुस्लिम समाजाचा पवित्र महिना सुरु आहे. दरम्यान दिनांक २१ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज इस्लाम जिमखाना मुंबई येथे रमजान महिन्याच्या निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
इफ्तार हे सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचे प्रतिक मानले जाते. या निमित्ताने इफ्तार पार्टीला उपस्थित राहून मुस्लिम बंधू-भगिनींना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माची मंडळी एकत्रित, आनंदाने सामील झाली. आपला भारत हा एकतेचे प्रतीक असलेला देश आहे. त्यामुळे, आपल्यातील आदर, बंधुभाव आणि प्रेमाची भावना अशी वाढीस लागो याच भावना आहेत.
या कार्यक्रमास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. प्रफुलभाई पटेल, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. नवाब मलिक मां,पार्थ अजित दादा पवार
AjitPawar:अल्पसंख्यक आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य हाजी वसिम बुरहान आमदार इद्रीस नाईकवाडी आमदार सना नवाब मलिक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यूवक महाराष्ट्र उपाध्यक्ष फरहान भाई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक बूलढाणा जिल्हा अध्यक्ष मोबीन अहेमद.सलीम भाई .राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संग्रामपुर तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक कलीम शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यक सचिव साबीर शेख व यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.