
बुलढाणा | जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, चाळीसटपरी आणि गोमाल परिसरातील आदिवासी बांधवांनी रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही दुर्गम आदिवासी गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल तुपकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल
भिंगारा, चाळीसटपरी आणि गोमाल या गावांना जोडणारा पक्का रस्ता अद्याप उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. रस्ता झाल्याचा फक्त फलक लावण्यात आला असून प्रत्यक्षात रस्ता नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ravikanttupkar
रस्त्याअभावी आरोग्यसेवा मिळवताना मोठ्या अडचणी येत असून, याच समस्येमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे गावांना जोडणारा पक्का रस्ता तातडीने करावा, तसेच सूनगाव ते बांडापिंपळ रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.suryamarathinews
आरोग्य सुविधांचीही वानवा या परिसरात साप-विंचू चावण्याच्या तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, २४ तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, तसेच सापाच्या विषावरील लस आणि रेबीजची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सादुरी खरात यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाची तपासणी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे.pwdnews
शाळा, अंगणवाडी आणि वीजेचा प्रश्न भिंगारा आणि चाळीसटपरी येथील जीर्ण झालेल्या शाळा व अंगणवाड्यांचे तातडीने पुनर्बांधकाम करावे, गावांना वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच चाळीसटपरी आणि गोमाल परिसरातील पात्र आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्यात यावेत, अशीही मागणी आहे.sdmnews
आदिवासी प्रमाणपत्रांचा मुद्दाही ऐरणीवर जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील भिलाला, पावरा, बारेला आणि राठिया जमातींच्या नागरिकांची चौकशी करून त्यांना शासकीय प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
गोमाल परिसरात २०२४ मध्ये साथीचे आजार आणि रस्त्याच्या समस्येमुळे तीन बालकांचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.तुपकर यांची प्रशासनाशी चर्चा
उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. तसेच वन विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महसूल विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.jalgaonnews
सर्व संबंधित विभागांची उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन समस्यांची पाहणी करावी आणि प्रत्येक मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली.
“मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार”
आदिवासी बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग आहेत. इतर नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा मिळतात, त्याच सुविधा आदिवासी बांधवांनाही मिळाल्या पाहिजेत. रस्ता, वीज, आरोग्य आणि शिक्षणासाठी नागरिकांना आमरण उपोषण करावे लागत असेल, तर ही प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले.drsanjaykute
सरकार आणि प्रशासनाने या बेमुदत उपोषणाची तातडीने दखल घेऊन मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आदिवासी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी पूर्ण ताकदीने लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेल, असा इशाराही तुपकर यांनी दिला.
Ravikanttupkar/आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि उपोषणाची सांगता कधी होते, याकडे भिंगारा, चाळीसटपरी आणि गोमाल परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



