
Pikvima :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम 2024 साठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2197.15 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळात माहिती दिली की ही रक्कम 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि राज्य सरकार विमा कंपन्यांना आवश्यक वाटा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा
शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने निधी मंजूर करण्यात थोडा उशीर झाला, मात्र आम्ही खात्री देतो की 31 मार्चपूर्वी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
” शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून विमा भरपाईची प्रतीक्षा होती. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
सरकारच्या या घोषणेनंतर विरोधकांनी विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार राहुल पाटील यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “खरीप हंगामातील पीक विमा ऑगस्ट महिन्यात मिळायला हवा होता. मात्र राज्य सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही,
Pikvima :त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या हक्काच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनीही विमा कंपन्या आणि बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.