Namo Shetkari / नमो शेतकरी योजनेसाठी १६४२ कोटी रुपयांची मान्यता; शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपये मिळणार

 

Namo Shetkari:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं १६४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पूरक म्हणून राबवली जात आहे आणि त्याद्वारे प्रत्येक वर्षी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपयांचे अनुदान तीन हप्त्यांत दिले जाते. नमो शेतकरी योजनेपासून आतापर्यंत ९१.४५ लाख शेतकऱ्यांना ९०५५.८३ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

BeedSantosh Deshmukh/ संतोष देशमुखांचा काटा का काढला? आरोपी सुदर्शन घुलेची कबुली

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी सहावा हप्ता आणि पूर्वीचे प्रलंबित हप्ते अदा करण्यात येतील. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांत २००० रुपये भेटतात.

महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यात ३००० रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकूण १५००० रुपये मिळणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांचे अनुदान मिळते.

Namo Shetkari:या योजनेअंतर्गत ऑक्टोबर २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील ११७.५५ लाख शेतकऱ्यांना एकूण ३३४६८.५४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य शासन पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत प्रदान करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here