
स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामराने एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक टिप्पणी केली आहे.यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली आहे.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अॅड. जयश्री शेळके (Advocate Jayashree Shelke) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्य हे कटू असतं. कुणाल कामरा यांच्या गाण्याने गद्दरांना मिरच्या झोंबल्याचे वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलं आहे.
drSanjayKute / जळगाव जामोद मतदारसंघात सिंचनासह उद्योग वाढीची गरज
ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी गायलं पुन्हा गायलं वादग्रस्त गाणं
कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जे गाणं गायलं होतं तेच गाणं पुन्हा जयश्री शेळके यांनी गायलं आहे. या गाण्यामुळे सत्य बाहेर आल्यामुळं गद्दारांना मिरच्या झोंबल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जयश्री शेळके यांच्याविरोधात बुलढाणा शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. बुलढाणा शिवसेना महिला आघाडीकडून जयश्री शेळके यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
Jayshretaishelke :जयश्री शेळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही केली आहे. यापुढे जर जयश्री शेळके यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली तर त्यांना भर रस्त्यात चोप देण्यात येईल असा इशाराही बुलढाणा शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.