
वाळू चोरीच्या जोरावर प्रशासनाची पंगत
revenue:बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दिवसा ढवळ्या एक वाजताच्या सुमारास अवैध वाळू उपसा होत आहे.
हा प्रकार पूलाखाली सुरू असून, वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्याचा आरोप आहे. यामुळे प्रशासनाचे हातही वाळूत ‘काळे’ होत असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर हिंसाचार: राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फेरा:-(Prakashambedkar)
खडकपूर्णा नदीवर परजिल्ह्यातील वाळू तस्करांचे लक्ष गेल्यानंतर अमर्याद वाळू उपसाला सुरुवात झाली आहे. स्थानिक वाळू चोर जेसीबी व मशिनच्या साहाय्याने रात्रंदिवस वाळू काढून त्याचा साठा करतात, तर रात्रीच्या अंधारात ही वाळू डंपरमध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीस नेतात.
महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
revenue:वेळीच या वाळू चोरांच्या मुसक्या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. “भितो का कुणाला…!” अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरू लागले आहेत