कापुस-सोयाबीन भाववाढसाठी कधीही न बोलणारे संजय कुटेंना जणता मतपेटीतून हिसका दाखवेल.प्रशांत डिक्कर (prashantdikkar)
prashantdikkar:संग्रामपूर/जळगाव जा. विधानसभा मतदारसंघात गेली 20 वर्षांपासून भाजपाचे आमदार संजय कुटे हे गरिबांच्या जीवावर निवडून येत आहेत. परंतु मतदार संघातील गोर गरिबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्या ऐवजी त्यांनी स्वतःचाच मजबूत आर्थिक विकास केला असल्याचे मत स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी व शेतमजूरांच्या प्रश्नावर प्रशांत डिक्कर यांनी वेळोवेळी प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले आहे.
त्याच १६ वर्षांच्या संघर्षातुन जणतेने प्रशांत डिक्कर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याने संजय कुटेंना या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. पुर्वीच्या पार पडलेल्या चार निवडणुकीत संजय कुटे यांना आपोआप यश प्राप्त झाले आहे.
पंरतु या निवडणुकीत ईतर पार्टीने कोणतेही उमेदवार मैदानात उतरवले तरीसुद्धा लढत महायुतीचे उमेदवार संजय कुटे व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे जणतेतुन बोलल्या जात आहे. प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी शेतमजूरांसाठी जीवाची बाजी लावत १६ वर्षांपासून अहोरात्र केलेली मेहनत आता फळाला आली आहे.
तर कुटे यांनी स्वतःची आर्थिक बाजु गडगंज मजबूत करण्यासाठी काही निवडक ठेकेदारांना हाताशी धरून संजय कुटे यांनी २० वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी शेतमजूरांसाठी एकही काम केले नसल्याने आता जणता त्यांना या निवडणुकीत हद्दपार करणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसात ऐकायला मिळत आहेत.
prashantdikkar:कापूस सोयाबीन भाववाढसाठी कधीही न बोलणारे संजय कुटे यांचा पराभव करून प्रशांत डिक्कर यांना कष्टकऱ्यांचा आवाज बनवून विधानसभेच्या सभागृहात पाठवण्यासाठी घरा घरातील माणुस आता सज्ज झाला आहे. हि निवडणुक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असून यामधे जणतेचाच विजय होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. एवढे मात्र निश्चित.