प्रशांत डिक्कर यांच्या घराचे फोटो काढून संजय कुटेंना काय साध्य करायचे आहे…….?(Vidhansabha )

 

Vidhansabha:काल दि.9/11/2024 रोजी संजय कुटे यांनी प्रचार दौरा प्रशांत डिक्कर यांचे मूळ गाव बोडखा येथे वळवला . कुटेनी गावातील मोजकेच लोक सोबत घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रशांत डिक्कर यांच्या घराचे चौरस फोटो घेतले.

प्रशांत डिक्कर यांच्या घराचे फोटो काढून संजय कुटे तुम्हाला काय साध्य करायचे आहे. असा प्रश्र्न बोडखा गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.


प्रशांत डिक्कर बद्दल लोकांचा प्रतिसाद पाहून निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने नेमक प्रशांत डिक्कर यांचा काटा काढण्यासाठी भाजप कडून काही नवनवीन प्रयोग आखल्या जात आहेत का अशीही चर्चा गावभर सुरू आहे.

१६ वर्षापासून कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी अविरत पणे प्रशांत डिक्कर लढा देत आहेत आणी या निवडणुकी मध्ये मतदार संघातील लोकांनी लोकवर्गणी करून प्रशांत डिक्कर यांना निवडणुकीच्या रणभूमी वर उतरवले आहे . मतदार संघात प्रशांत डिक्कर यांना वर्गणी देऊन प्रचंड पाठिंबा मिळत आहे. गावागावात हजारो लोकांच्या गर्दीत मिरवणुका काढल्या जात आहेत.

Vidhansabha:प्रशांत डिक्कर यांच्या प्रचाराचा वाढता प्रतिसाद पाहून महायुती चे उमेदवार संजय कुटे यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार कुटे चा पराभव होत असल्याने प्रशांत डिक्कर यांच्या घराचे फोटो काढून भाजप वाल्यांना अधिक काही साध्य करायचे आहे की काय अशी ही चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here