
Nagpurnews:नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर, शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून 80 जणांना अटक केली आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
गणेशपेठ, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, आणि कपिलनगर या भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुलीवर बापाचा अत्याचार: जलंब पोलीस ठाण्यातील प्रकरण ( RapeNews)
सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. हे प्रदर्शन महाल भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झाले. त्यानंतर संध्याकाळी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली
आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्याचा हात जायबंदी झाला आहे.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत. जवळपास 1800 सोशल मीडिया अकाऊंट्स तपासण्यात आली आहेत. नागपूरच्या महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
Nagpurnews:महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत