50MP कॅमेरासह येणारा Vivo V30 Pro आता क्रोमावरून स्वस्तात खरेदी करा (mobaile)

 

mobaile:भारतातील स्मार्टफोन बाजारात सेल्फी आणि फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेल्या Vivo V30 Pro स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. हा फोन प्रीमियम फीचर्ससह येतो, ज्यामध्ये 50MP फ्रंट कॅमेरा, 512GB स्टोरेज आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर यांचा समावेश आहे.

Vivo V30 Pro च्या 12GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 46,999 रुपये आहे, तर 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट 41,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर क्रोमा वरून खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट मिळते आणि एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही आणखी बचत करू शकता.

मारुती एस-प्रेसोच्या किंमतीत वाढ; आता किती लाख रुपये द्यावे लागेल?(maruticars)

Vivo V30 Pro मध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर दिले आहेत.

फोनमध्ये अ‍ॅक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी आणि जायरोस्कोप सारखे सेन्सर्स आहेत. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. सुरक्षेसाठी, हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या फोनला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.

Vivo V30 Pro स्मार्टफोनमध्ये OIS Sony IMX920 50MP सेन्सर, AF Sony IMX816 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP AF वाइड अँगल लेन्स आहे. यामध्ये ड्युअल व्ह्यू, लाईव्ह फोटो आणि पोर्ट्रेट सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo V30 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP कॅमेरा आहे.

mobaile:यात हाय-रिझोल्यूशन, अल्ट्रा एचडी, स्लो-मोशन, टाइम-लॅप्स, सुपरमून आणि स्पोर्ट्स सारखे कॅमेरा स्पेसिफिकेशन आहेत. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here