Former

खोटे बिल सादर केल्याची तालुका कृषि कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल.(Krushinews)

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

Krushinews:बुलढाणा:-शेती हा मानवी जीवनाचा व जगण्याचा मुख्य भाग आहे.परंतू यामध्ये सुद्धा खोटे बिलच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची लेखी तक्रार तालुका कृषी कार्यालयाकडे तकारकर्ते विदया सुरेश चोपडे व सुरेश दामोधर चोपडे रा. अकोली बु. ता. संग्रामपूर जि. बुलडाणा यांनी गैरतकारकर्ते:-श्रीकृपा कृषि केंद्र प्रो.प्रा. गणेश गाळकर रा. चांगेफळ ता. संग्रामपूर जि. बुलडाणा व निर्मल सिड्स, प्रा.लि. पाचोरा, जळगाव ता. पाचोरा. जि. जळगाव यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी केली आहे.

गैरतकारकर्ते यांनी तकारकर्ते यांना बोगस बियाने विकी करुन त्या संदर्भात खोटे बील दिल्यामुळे दंडात्मक कार्यवाही करण्याचे म्हटले आहे.

आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील घटनेचा निषेध(Hingnghat)

तक्रारकर्ते हे वरील ठिकाणचे रहीवाशी असुन तकारकर्ती कं. 1 यांच्या नावे मौजे अकोली खु. ता. संग्रामपुर जि. बुलडाणा येथे गट कं. 15, एकुन क्षेत्रफळ 10 हे. 18 आर. एवढे असुन तकारकर्ती हीच्या नावे 0.50 हे.आर. व 1.29 हे. आर. असे एकुन 01 हे. 79 आर. एवढे क्षेत्रफळ मालकी हक्काचे व वहीतीत आहे.तकारकर्ता कं. 2 हे तकारकर्ती कं. 1 चे पती असल्या कारणाने सदर शेतीची वहिवाट करतात.

त्यामुळे त्यासाठी लागणारे वि बीयाने खते,औषधे सारेदी करीत असतात. सन 2024-25 खरीप हंगामाकरीता त.क.र्क. 2 यांनी वरील क्षेत्रफळा गध्ये सुर या पिकाची लागवड करण्याकरीता गैरतकारकर्ता यांच्याकडे दि. 13/06/2024 रोजी बीयाने खरेदी केलेले आहे.त्याचा इनव्हाईस नं. एस 200 हा आहे.
सदर बियाने नेउन त.क.यांनी वरील क्षेत्रफळामध्ये इतर शेतक-यां बरोबरच पेरा केलेला आहे.

सदर पिक आज रोजी पाच ते सहा महिन्याचे झाले असुन आजरोजी सदर पिकाला फुलोरा व पुर्ण शेंग चरण्याच्या अवस्थेमध्ये असणे गरजेचे होते.तसेच इतर शेतक-यांच्या तुरीचे पिक बहरलेले आहे.परंतु त.क. यांची तुर पिक हे आज रोजी फक्त हीरखे असुन त्याला कुठेही फुल व फळ चारणा झालेली नाही.ते फक्त शेवरे या शहासारखे उभे असुन उत्पन्न देणारे दिसत नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वास्तविक पाहता सर्व पोषक वातावरण हे इतर शेतक-यांबरोबरच त.क.यांच्या पिकाला मिळालेले आहे. त.क.यांनी सुरवातीपासुनच तुर या पिकाची प्रचंड गेहनच घेतली असुन त्याला वेळोवेळी फवारे, निंदणे, खुरपणे इत्यादी सर्व वेळोवळी दिलेले आहे.तुरीला बालपनापासुन ते आतापर्यंत जवळपास वरील क्षेत्रफळा करीता दिड लाख रु. खर्च त.क. यांनी केलेला आहे.

Krushinews :तसेच या वर्षीचे तुरीचे पिक पाहता त.क. यांना वरील दक्षेत्रफला मध्ये 50 क्वीटर तुर पिक होण्याचा अंदाज होता, परंतु गैस्तकारकर्ता यांनी बोगस बियाने दिल्यामुळे अंदाजे पाच लाख रु. नुकसान झाले आहे त्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button