
Water:मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसानंतरही ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक गावांना खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. या तालुक्यातील अंढेरा, डोड्रा, बोराखेडी बावरा, डिग्रस खुर्द या गावांना चार खाजगी विहिरीद्वारे पाणी मिळत आहे.
मेहकर, लोणार आणि शेगाव तालुक्यातील काही गावांनाही अशाच प्रकारे पाणी पुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील 1410 पैकी 806 गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी 1343 उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात टँकरद्वारे पाणी पुरवठा, अधिग्रहित खाजगी विहिरी, नवीन विंधन विहिरी, नळ योजनाची दुरुस्ती यासारख्या उपायांचा समावेश आहे.
Water:या आराखड्यावर 16 कोटी 96 लाख रुपये खर्च होणार आहे.