Lonarnews/एसडीएम साहेब सेतू केंद्रांवरील लूट थांबउन स्टॅम्प पेपर शासकीय दरातच द्या. डॉ. गोपाल बच्छीरे

 

​
​लोणार (प्रतिनिधी): तानाजी अंभोरे

दुष्काळी परिस्थितीने होरपळणाऱ्या शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांची सेतू सुविधा केंद्र व स्टॅम्प वेंडर्सकडून सुरू असलेली आर्थिक लूट तात्काळ थांबवा, सर्व केंद्रांवर शासकीय दरपत्रकाचे फलक लावणे बंधनकारक करावे आणि जादा दर आकारणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी उपविभागीय अधिकारी श्री सानप यांच्याकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बच्छीरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार लोणार यांना निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने आदेश न काढल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोणार तालुका सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. अशा बिकट संकटात विविध शासकीय योजना, दाखले, सरकारी पोर्टलवरील ऑनलाईन कागदपत्रे, शपथपत्रे तसेच सातबारा उतारा मिळवण्यासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रांवर जावे लागते. मात्र, सेतू केंद्र चालक शासकीय नियमांची पायमल्ली करत नागरिकांकडून मनमानी पद्धतीने २०० ते ५०० रुपयांपर्यंत अवाजवी रक्कम वसूल करून लूट करत आहेत.tahsilnews

​तसेच, १०० रुपयांच्या मुद्रांकासाठी (स्टॅम्प पेपर) स्टॅम्प वेंडर्सकडून सर्रास १२० रुपये उकळले जात असून नियमांचे उघड उल्लंघन सुरू आहे. या प्रकारामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी वर्ग व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.sdm news

​त्यामुळे तहसील प्रशासनाने सेतू सुविधा केंद्र चालक व स्टॅम्प वेंडर्स यांच्या नावे तात्काळ कठोर आदेश पारित करावेत. प्रत्येक कागदपत्राचे व सेवेचे शासकीय दर दर्शविणारे फलक केंद्रांच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे. तसेच जादा पैसे घेतल्याची तक्रार आल्यास संबंधित केंद्रांचे व वेंडर्सचे परवाने थेट रद्द करण्यात येतील, अशी सक्त ताकीद देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास जनहितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Lo​nar news/हे निवेदन देतेवेळी जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बच्छीरे, शहर प्रमुख गजानन जाधव, माजी उपनगराध्यक्ष बादशाह खान, प्रकाश सानप, श्रीकांत मदनकर, तारामती जायभाये, लीलाबाई मते, एकबाल शेख, अशपाक खान, तानाजी अंभोरे, ओवेस कुरेशी, फहिम खान, शेख सादिक, ज्ञानेश्वर दूधमोगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here