नागपूरातील रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाची दमदार कामगिरी ( Ranji Trophy Final )

 

Ranji Trophy Final :नागपूर येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या अंतिम सामन्यात विदर्भ आणि केरळ यांच्यातील सामना रोमांचक वळणावर आहे. विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा उभारल्या होत्या, त्यानंतर केरळने त्यांच्या डावाचे जोरदार प्रत्युत्तर दिले.

केरळच्या आदित्य सरवटेने अर्धशतक ठोकले, तर सचिन बेबीचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याच्या ९८ धावांच्या खेळाने केरळच्या संघाला आघाडी घेण्याची संधी मिळाली होती, पण ती संधी हुकली.

लाडकी बहीण योजनेतील नवीन अपडेट: महिलांना कसे मिळणार ३००० रुपये? (Ladki Bahin Yojna)

विदर्भाच्या गोलंदाजांनी केरळचा डाव ३४२ धावांवर गुंडाळला, ज्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली.

केरळच्या डावात आदित्य सरवटे आणि अहमद इमरान यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर सचिन बेबीने सलमान निझारसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली.

नागपूरातील रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाची दमदार कामगिरी ( Ranji Trophy Final )

पण सचिनच्या शतकाची आशा मावळल्याने केरळचा डाव घरंगळला. विदर्भाच्या हर्ष दुबेने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आणि हंगामातील एकूण ६९ विकेट्स पूर्ण केल्या.

Ranji Trophy Final ::त्याच्या या कामगिरीने विदर्भासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here