
puneswargatecase:पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ मचली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या जाळ्यातून सुटून होता.
अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत त्याला पोलिसांनी पकडले. आरोपी दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झाला होता.
नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)
स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार यांनी त्याला शिताफीने पकडले.
आरोपी दत्ता गाडे हा मूळचा गुनाट गावचा असून, त्याच्या घरी आणि मित्रांकडे चौकशी केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा काही लागला नव्हता. अखेर त्याचं शेवटचं लोकेशन गुनाट गावात आढळल्यानंतर पुणे पोलिसांनी त्या गावाभोवती आपले लक्ष केंद्रित केले.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पकडला (puneswargatecase)
puneswargatecase:स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराची घटना घडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट डेपोतील सर्व 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित केले होते. या घटनेनंतर महाराष्ट्रातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.