सावधान! हृदयविकाराने होताहेत सर्वाधिक मृत्यू ,काळजी कशी घ्यावी बघा..(Heart)
Heart:तुम्हाला सुद्धा सातत्याने थकवा जाणवतो का किंवा तुम्ही नेहमीच स्वतः ला तणावात पाहता का? तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित राहतात का.. जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर तुम्ही सुद्धा हृदयविकाराच्या सूरुवातीच्या लक्षणांचा सामना करत आहात.
आज काल चाळीस पेक्षा जास्त वयाच्या अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरोल यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
जागतिक हृदय दिवस दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदयाशी संबंधित आजरांबाबत जागरूकता वाढविण्याचाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
आजकालच्या धावपळीच्या बहुतेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तणाव वाढत चालला आहे. कामाचाही ताण वाढला आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आहराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सगळ्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाला आहे.
Heart:हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. अन्य आजारांचाही विळखा घट्ट होत चालला आहे. आज जागतिक हृदय दिन आहे.