
B uldhana Takkal virus: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केसगळतीच्या प्रकरणांनी गेल्या काही काळापासून खळबळ मांडली आहे. या प्रकरणाच्या संबंधात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की ही केसगळती रेशनच्या गव्हामुळे किंवा पाण्यामुळे झालेली नाही. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सर्वेक्षण करण्यात आले आहे आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या सुरू आहेत.
सर्वेक्षण आणि तपासणी: केसगळतीच्या प्रकरणांच्या गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गव्हाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. आयसीएमआरला त्यांची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी: या गावांमधील लहान मुले आणि गर्भवती महिलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
अन्नधान्याची तपासणी: राज्यातील अन्नधान्य वाटप योजनांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वाटप होते का नाही याची तपासणी करण्यात येत आहे
Buldhana Takkal virus:अल्पकालीन चर्चेदरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे यांनी ही माहिती दिली. या चर्चेत सदस्य किशोर दराडे, विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला.