बद्रीनाथच्या देव-दर्शनाला गेलेल्या भाविकांना टँकरने चिरडलं, अकोल्यातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू..!(Brekingnews )
Brekingnews:अकोला: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. जम्मू-कश्मीरच्या श्रीनगर येथे टँकर अनियंत्रित होऊन हॉटेलात घुसला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन्ही महिला आहेत.
बद्रीनाथचं दर्शन करून श्रीनगरमध्ये आल्यावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. ही घटना मंगळवारी रात्री उत्तराखंडमधील श्रीकोट येथे घडली.
टँकरने चिरडल्याने दोन महिलांचा मृत्यू
अपघातात तेल्हारा शहरातील ललिता हरीश तावरी (वय ५० गोपाल जीन अकोला) आणि सरिता उर्फ गौरी नरेश (वय ५०, तिजकरा अकोला) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. अकोला आणि हिवरखेड येथील तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सारिका राजेश राठी (४६), संतोषी धनराज राठी (४५), मधुबाला राजेंद्र कुमार (५४) या जखमी झाल्या आहेत. जखमींवर श्रीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अन भिंत तोडून टँकर हॉटेलमध्ये घुसला ...
अकोला येथील हे भाविक बद्रीनाथ येथे दर्शनाला गेले होते. यामध्ये अकोला आणि अमरावती येथील भाविकांचा समावेश होता. यावेळी बद्रीनाथ येथे दर्शन करुन परत येत असताना ते श्रीकोट येथील हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी मंगळवारी रात्रीच्या सुमारास या महिला हॉटेलबाहेर बसून बोलत होत्या.
तेव्हा तिथे भरधाव वेगात टँकर घुसला आणि त्याने या महिलांना चिरडलं. हा टँकर श्रीनगर येथून श्रीकोटाला जात होता. यादरम्यान तो नियंत्रणाबाहेर गेला. सुरुवातीला त्याने एका वासराला धडक दिली त्यानंतर त्याने भिंत तोडून आत घुसला आणि महिलांना चिरडलं. जेसीबीच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी ललिता यांना तपासून मृत घोषित केलं. तर, सरिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर महिलांवर उपचार सुरु आहेत. एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे,
Brekingnews :-तर दोघींना किरकोळ दुखापत झाली आहे. श्रीनगर येथील गढवाल बेस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.