प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण येथे पाय घसरून तरुणाचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू ( brekingnews )

 

यावल(प्रतिनिधी)विकी वानखेडे

मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्याचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. वेदांत सुवर्णसिंग पाटील वय-२०, रा ल. निमगाव ता. यावल असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता. सध्या तो पदवीचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता.

उद्धव भाऊ माझा पाठीराखा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( uddhavthakre )

आज रक्षाबंधनच्या निमित्ताने सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी निमगावपासून जवळ असलेल्या निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता.

त्यावेळी मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यानंतर तो वर आलाच नाही. त्यामुळे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले व तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

Brekingnews :यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल तायडे यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई-वडील यांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here