
accdentbus:सोमवार दुपारी १.४३ वाजण्याच्या सुमारास लातूर-चाकूर महामार्गावरील नांदगाव पाटीजवळ एका दुचाकीस्वाराच्या अचानक वळणामुळे एस.टी. बस उलटली.
या अपघातात ३७ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गमावल्याने बस उलटली.
महिला सुरक्षा संकट: रक्षा खडसेंच्या मुलीची छेड (devendrafadnvis)
जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आणि प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांनीही तत्काळ हस्तक्षेप केला.
जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून, गंभीर जखमींवर विशेष निगराणी ठेवण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी सर्वोपचार रुग्णालयात मोठी गर्दी केली. घटनेनंतर एस.टी. महामंडळाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
accdentbus:बस चालकाच्या जखमी अवस्थेमुळे त्याचे जबाब अद्याप नोंदवले गेलेले नाहीत