
टेक महाराष्ट्र ब्युरो
farmernews:नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण’ झाल्याचा आनंद व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतीशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा सत्कार केला. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याचे वितरण हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा उल्लेख केला. या योजनेतील वार्षिक 6000 रुपयांच्या अनुदानात आणखी 3000 रुपयांची वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवीन आशा – भंडारा ते बुलढाणा दरम्यान नदी बांधणी (devendrafadnvis)
त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांच्या माध्यमातून वार्षिक 15 हजार रुपये जमा होतील. या योजनांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून विदर्भात 25000 कोटींचे 89 प्रकल्प पूर्ण केल्याचा उल्लेख केला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच ‘स्व. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’च्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भात पहिल्या टप्प्यात 4000 कोटींची जलसंवर्धन व इतर विकासकामे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी 6000 कोटींची विकासकामे सुरु असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी बांधवांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘स्मार्ट’ योजनेचा व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘ॲग्री स्टॅक’चाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला.