व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( Viral Video )

 

Viral Video:27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे, विकी कौशल, आशा भोसले, अशोक सराफ, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, लक्ष्मण उत्तेकर यांनी कविता सादर केल्या.

न्यायालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक (Anti-Corruption Action)

सोनाली बेंद्रे यांनी विंदा करंदीकरांची “देणाऱ्याने देत जावे” ही कविता सादर केली. या कार्यक्रमानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत,

ज्यात राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत.

व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( Viral Video )

सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील एक व्हिडिओ विशेषतः चर्चेत आहे, ज्यात सोनाली बेंद्रे राज ठाकरेंना पुढे येण्यासाठी खुणावत असल्याचे दिसते. 90 च्या दशकात त्यांच्यातील चांगली मैत्री होती, ज्याची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली आहे.

Viral Video:1996 मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्रितपणे उपस्थित होते होते आणि त्यावेळचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here