Maharashtra
ST प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन करण्याची सुविधा(st )
St :एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी, जेणेकरून त्याचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ST प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन करण्याची सुविधा(st )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उद्धट बोलतो किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरले नाही.
St:अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात.या तक्रारींना हा उपाय प्रवाशांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे.