
Santoshdeshmukhmurdercase:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. ही हत्या खंडणी प्रकरणातून घडल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो पाहून त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या शब्दांबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
संग्रामपूरात अवैध रेती वाहतूक जोरात महसूल प्रशासनाची कारवाई शून्य (revenue)
वैभवीनं सांगितलं की, “माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणात झाली. ती खंडणी कुणाकडं जात होती? ती खंडणी मागायला यांना कुणी पाठवलं होतं? हे वरदहास्तशिवाय होणे शक्य नाही.
त्यांना सहआरोपी करुन कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मी करते.” वैभवीनं या प्रकरणातील आरोपींच्या क्रूरतेचा उल्लेख करताना सांगितलं की, “ते फोटो पाहून आम्ही निशब्द आहोत.
त्याबद्दल काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही. ही खंडणी कुणाकडं जात होती हा प्रश्न आहे. त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? पोलीस प्रशासनही यामध्ये काही करु शकत नाहीत, असा आरोप मी करते.”
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्रातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणातील आरोपींनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचं समोर आलं आहे. वैभवीनं आपल्या वडिलांच्या शेवटच्या शब्दांबद्दल सांगितलं की, “माझे वडील शेवटी देखील सांगत होते मला माझ्या मुला-मुलींसाठी जगू द्या.
Santoshdeshmukhmurdercase:मला माझ्या गावाला पुढं न्यायचं आहे. मला माझ्या गावासाठी जगू द्या. त्यांना कुणाचातरी हात असल्याशिवाय हे शक्य नाही. हा हात कुणाचा आहे हे सरकारनं कळवलं पाहिजे.