संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर: काय आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी?(Santosh Deshmukh Case)

Santosh Deshmukh Case:डिसेंबर महिन्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यभरात मोठे आंदोलन सुरु आहे. या प्रकरणातील एका आरोपीला, सिद्धार्थ सोनवणेला, केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 25 हजारांच्या जातमुचालक्यावर मंजूर झाला आहे.

सीआयडीने सिद्धार्थ सोनवणेविरोधात पुरावे नसल्याने त्याच्या नावाचा समावेश आरोपपत्रात केला नव्हता, त्यामुळे त्याला जामीन मिळाला आहे.

पाण्याची तंगत: बुलढाणा जिल्ह्यातील गावांची पाण्याची समस्या वाढत आहे ( Water )

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य सरकारने सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. मागच्या आठवड्यात सीआयडीने 1800 पानाचे आरोपपत्र दाखल केले

, ज्यात वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे नमूद केले आहे. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी उकळण्यामध्ये ते अडथळा ठरत होते म्हणून करण्यात आल्याचा आरोप आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर: काय आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी?(Santosh Deshmukh Case)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Santosh Deshmukh Case:मकोका कायदा संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये खंडणी वसुली, हप्ता वसुली, अपहरण, हत्या यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here