भाजपाच्या फसव्या योजनांना बळी पडू नका ! राजू शेट्टी.(rajushetty )
शिवजन स्वराज्य यात्रेचा संग्रामपुरात समारोप.
शिवजन स्वराज्य यात्रेचा संग्रामपुरात समारोप.
rajushetty:केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला जनता आता कंटाळली असल्याने या पुढच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याच्या विश्वास या सरकारला नसल्याने लाडकी बहीण सारख्या फसव्या योजना हे सरकार आणत आहे.
पण जनता आता यापुढे फसणार नाही त्यांना सत्तेवर येऊच देणार नाही. शेतकरी शेतमजुरांसाठीची लढाई आता स्वाभिमानी शेतकरी संघटना थांबणार नाही म्हणून साथ द्या असे आवाहन सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी संग्रामपूर येथे पार पडलेल्या शेतकरी महामेळाव्यात बोलतांना केले.
शिवजन स्वराज्य यात्रेचा समारोप काल पार पडला त्यानिमित्ताने येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या महामेळावा पार पडला यावेळी बोलताना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर म्हणाले की जळगाव जा. विधानसभा मतदारसंघातील जनता स्थानिक आमदाराच्या कारभाराला कमालीची कंटाळली आहे. जळगाव जा. तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात कोट्यावधीचा घोटाळा झाला.
त्यामुळे पात्र शेतकरी वंचित राहिले. तर काही भाजपा कार्यकर्त्यांना भरघोस लाभ दिला गेला. कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाठबळ देऊन कोणावरच कारवाई होऊ दिली नाही हे सरकार फक्त घोषणा करते अमलबजावणी काहीच करत नाही.
जळगाव शेगाव येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत जो अनुचित प्रकार घडला तो निवडणूकवर डोळा ठेवून घडवून आणल्या गेला असा आरोप त्यांनी यावेळी करून जनतेने आता यापुढे सावध राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी उत्तर प्रदेशातील शेतकरी नेते व्ही. एम. सिंग , संदीप पाल महाराज , डॉ.रामपाल महाराज
मराठवाडा विभाग अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील प्रा.प्रकाश पोफळे, सम्मेद पाटील वंदनाताई डिक्कर, सय्यद बाहोद्दीन, इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
rajushetty:प्रशांत डिक्कर यांचे नेतृत्वात शिवजन स्वराज्य यात्रा जळगाव जा. मतदार संघातील १९१ गावातून फिरली नागझरी येथून ४ सप्टेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ झाला होता. तर काल २० सप्टेंबर रोजी महामेळाव्याने या यात्रेचा समारोप झाला प्रत्येक गावातून यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला कालच्या महामेळाव्याला पंधरा ते वीस हजार नागरिकांची उपस्थिती होती.त्यामुळे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा ऐतिहासिक झाल्याच्या प्रतिक्रिया जणमाणसांतुन उमटत आहेत.