
Pune Swargate Bus Stand :पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 फेब्रुवारी रोजी एक संतापजनक घटना घडली. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस आगारात जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली.
या घटनेनंतर, उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंशी संपर्क साधून त्यांच्या कृतीचे कौतुक केले.
गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )
वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील तोडफोड केल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरून बोलताना म्हटले, “वसंत मोरे, तुम्ही चांगलं केलंत, जोरात केलंत.
काय हे सगळं बोलण्याच्या पलिकडे चाललंय.” वसंत मोरे यांनी त्यांच्या प्रतिसादात म्हटले, “हो साहेब, एसटीमध्ये घाणेरडा प्रकार होता. शिवशाहीच्या चार बंद पडलेल्या बसेसमध्ये अक्षरशः लॉजिंग केलंय.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण जे काय लढतोय तेच सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. जीव जळतोय हे सगळं पाहून, महाराष्ट्र कुठे चाललंय? यां लोकांना पोलिसांचीही भीती नाही. पण तुम्ही चांगलं केलंत. सगळ्यांना धन्यवाद द्या आणि असेच जागते रहा.”
Pune Swargate Bus Stand :वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंना धन्यवाद दिला आणि “जय महाराष्ट्र” असं म्हणत फोन ठेवला. या घटनेनंतर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे