
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पोलिसांसमोर आव्हान
जळगाव जामोद शहरातील कृष्णा नगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचा कुलूप तोडून तब्बल आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नगर येथे राहणारे मनोज वासुदेव वानखडे हे तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवतात.
महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल: हर्षवर्धन सपकाळ यांची टीका (Harshvarrdhan Sapkal)
५ मार्च रोजी ते आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर त्यांनी मेडिकलच्या दुकानाचे कुलूप तुटलेले आढळले. दुकानातील ड्रॉवर आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, लग्नातील सोन्याचा राणीहार, नेकलेस, पोत, अंगठी आणि कानातील फुले असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले आहे.
या प्रकरणी मनोज वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०५ (ए), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत नीचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करत आहेत.
फिर्यादी वानखडे यांनी तीन चोरटे गावठी कट्टा, चाकू आणि मोटारसायकलसह चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही पुरावे पोलिसांना सादर केले आहेत.
मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून, तपास संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. जळगाव जामोद शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
अबु अझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित; देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात हल्लाबोल ( Devendrafadnvis)
पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यास अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे,” असे मत फिर्यादी वानखडे यांनी व्यक्त केले.
Policenews :पोलीस प्रशासन कधी सक्रिय होणार? या गंभीर घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे.