
Nanapatole:महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावर नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महाविकास आघाडीत सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे.
जर ते भाजपाची साथ सोडून आघाडीत येतील तर त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेतून आली आहे, जिथे त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले जात आहे.
बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची सध्याची परिस्थिती महायुती सरकारमध्ये खूपच वाईट आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या भविष्याची शाश्वती नाहीशी झाली आहे.
त्यांच्या योजना थांबवल्या जात आहेत आणि त्यांच्या समर्थकांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने त्यांना सुरक्षित भविष्याची आश्वासन दिली आहे.
Nanapatole:नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काही दिवसांसाठी मुख्यमंत्री बनवू. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य काळजी घेतली जाईल.” ही घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.