बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार (Krāntikārī śētakarī saṅghaṭanā)

 

Krāntikārī śētakarī saṅghaṭanā:बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या अकोला, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बऱ्हाणपूर आणि इतर शेजारील जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे. या कारवाईच्या मागे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजकीय दबाव टाकल्याचा आरोप आहे.

रायपूर येथे पाणपोई व महीला निवारा चे उद्घाटन(Waternews)

बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार (Krāntikārī śētakarī saṅghaṭanā)

डॉक्टर. ज्ञानेश्वर टाले हे गेल्या १३ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांना राग आला असल्याचे सांगितले जाते.

Krāntikārī śētakarī saṅghaṭanā: डॉ. टाले यांच्यावर आंदोलनातील गुन्हे आहेत, पण त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यात आल्याचा आरोप आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही तडीपाराची कारवाई म्हणजे शेतकरी चळवळ दडपण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here