धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामागे काय आहे? करूणा मुंडे यांची भूमिका (Karunamunde)

 

Karunamunde:महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अलिकडेच राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक वादग्रस्त प्रकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.

यातलंच एक प्रकरण म्हणजे करूणा मुंडे यांचे. मध्यप्रदेशातील इंदूरच्या रहिवाशी असलेल्या करूणा मुंडे या मुंबईत राहतात आणि सामाजिक कार्यात गुंतलेल्या आहेत.

पुणे स्वारगेट रेप प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश ( puneswargatecase)

त्या धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा दावा करतात आणि त्यांच्या मुलांना धनंजय मुंडे यांचे नाव दिल्याचे सांगितले जाते.

करूणा मुंडे यांची पार्श्वभूमी

करूणा मुंडे यांचे मूळ नाव करूणा शर्मा असून, त्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहतात. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, ज्यात त्यांनी आपल्या आईला त्रास दिला, त्यांना तुरूंगात टाकले, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी त्यांची मारहाण केली अशा आरोपांचा समावेश आहे.

वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करूणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. करूणा मुंडे यांनी 15 लाख रुपये पोटगी मागितली होती आणि उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पार्श्वभूमी

धनंजय मुंडे यांनी अलिकडे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपांमुळे राजीनामा दिला. या प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचे आरोप होते.

Karunamunde:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here