
Devendrafadnvis:महाराष्ट्रातील नागरिकांसाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे,
ज्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून वीज दर 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मध्यरात्री उशिरा जाहीर केला.
या कपातीचा सर्वात जास्त फायदा घरगुती वीज वापरकर्त्यांना होणार आहे, विशेषतः उन्हाळ्यात वीज वापर वाढण्यामुळे ज्या लोकांची बिले अधिक येतात, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Devendrafadnvis / मोठी बातमी: महाराष्ट्रात वीज दर 10 टक्क्यांनी खाली येत असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना दिलासा मिळणार
हा निर्णय महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर घेण्यात आला आहे. नव्या वीज दरानुसार, वीज वापरकर्त्यांच्या बिलांमध्ये विशेषतः 101-300 युनिट वापर करणाऱ्यांना आर्थिक बचत होणार आहे.
Devendrafadnvis :मुंबई क्षेत्रात मात्र बेस्टच्या दरात 15-20 टक्क्यांची वाढ असल्याचे दिसून येत आहे. एकूणच सर्वसामान्य नागरिकांना या नव्या दरांमुळे मोठी दिलासा प्राप्त होणार आहे.