
Brekingnews:सोमवार, १७ मार्च रोजी चिखली तालुक्यातील शेलोडी येथे एक भीषण घटना घडली. या दुर्दैवी घटनेत शालिग्राम वाळूस्कर आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर यांचा जुनाट घराच्या छताच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या गावातील एका जुन्या घराची पाडण्याच्या कामादरम्यान घडली.
शेलोडी येथील दामोदर घाडगे यांनी जुने घर पाडून नवे घर बांधायचे ठरविले होते. त्यांनी गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना हे काम दिले होते.
सोमवारी सकाळी शालिग्राम वाळूस्कर, त्याचा मुलगा योगेश, राम घाडगे आणि सुनील नेमाने यांनी माळूद पाडण्याचे काम सुरू केले.
घराचा धाबा कोसळला, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू(Brekingnews)
मात्र, जीर्ण झालेले छत कोसळले आणि शालिग्राम वाळूस्कर (६५) आणि योगेश वाळूस्कर (३२) यांचा मृत्यू झाला. राम घाडगे आणि सुनील नेमाने हे दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांना चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले.
Brekingnews :गावकऱ्यांनी चौघांना ढिगाऱ्याखालून काढले आणि जखमींची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे शेलोडी गावात शोककळा पसरली आहे