Ajitpawar / राज्यातील कर्जमाफी संकट: अजित पवारांचे विधानवर काँग्रेसची टीका

 

AjitPawar:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रमुख विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत पीक कर्जाची परतफेड करण्याची सूचना दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र आता शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची सूचना देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने तीव्र टीका केली आहे.

Crimenews / छातीत कुऱ्हाड घालून पुतण्याने घेतला काकाचा जीव ! हत्ये नंतर आरोपी पुतण्या पोलीस ठाण्यात झाला हजर !

अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सगळी सोंग करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही.

मी राज्यातील जनतेला सांगतो ३१ मार्चच्या आत आपले पीक कर्जाचे पैसे भरा. यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले आहे.”

त्यांनी या वर्षी आणि पुढील वर्षी पीक कर्जमाफी होणार नाही असेही स्पष्ट केले आहे, कारण त्यासाठी आर्थिक स्थिती अनुकूल नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करताना म्हटले की, “महायुतीने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते मिळवली आणि आता कर्जमाफी मिळणार नाही असे म्हणत आहेत.

AjitPawar: लाडकी बहीण योजनेबाबतही फसवणूक केली आहे.” या विधानावरून राजकीय पटलावर तीव्र चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here