होळीनिमित्त गेट-टुगेदरचा परतीचा प्रवास अपघातात संपला(accdentnews)

 

accdentnews:नागपूरच्या बुटीबोरी येथे होळीनिमित्त गेट-टुगेदरसाठी वर्ध्याला गेलेल्या गटाच्या परतीच्या प्रवासात एका भयंकर अपघाताची घटना घडली.

या अपघातात महिंद्रा XUV 700 कार उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

होळी सणाच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेतेवर धडक कार्यवाही (policenews )

हा अपघात नागपूर-हैदराबाद नॅशनल हायवे आणि बुटीबोरी-तुळजापूर हायवेवरील टी-पॉईंटजवळ झाला.

अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम बाफना, हिमांशू बाफना आणि मानसी बदानी हे तिघे होळीनिमित्त गेट-टुगेदरसाठी वर्ध्याला गेले होते.

परत येत असताना अरिंजय आणि त्याची बहीण अक्षता यांना वर्धेतून सोबत घेतले. वर्ध्याहून नागपूरला येत असताना कार चालवणाऱ्या त्यांच्या मित्राने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली.

रस्ता चुकल्याचं लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला आणि भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला जाऊन धडकली आणि 20 फूट खाली कोसळली. या अपघातातील जखमींना नागपूरच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातात अरिंजय अभिजीत श्रावणे याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण अक्षता अभिजीत श्रावणे ही गंभीर जखमी झाली आहे.

accdentnews:बुटीबोरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here