बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )

 

Maharashtra Political:अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा येथे होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वेगळ्या पद्धतीने धुळवड साजरे केले.

त्यांनी ५ किलोमीटर लांबीचा रस्ता रंगवून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून कडू यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आणि शेतकऱ्यांच्या दुर्लक्षित मागण्यांवर भर दिला.

जळगाव जामोदच्या कृष्णा नगरमध्ये आठ लाखांची घरफोडी – चोरटे पसार!(policenews )

बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आवाहन केले.

ते म्हणाले, “रंगपंचमी हा उत्सव आहे, पण यातून आम्ही सरकारकडे विविध मागण्या करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने रंगाचे राजकारण करून शेतकऱ्यांना मूर्ख बनवले आहे. कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण झाले नाही.

 

शेतमालाला भावही मिळत नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय केला आहे.” त्यांनी दिव्यांगांच्या पैसे अद्यापही मिळाले नसल्याचा आरोपही केला.

कडू यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावरही टीका केली. ते म्हणाले, “नानाभाऊंची ही ऑफर हास्यास्पद आहे. काँग्रेसचे २० आमदार आहेत, पण त्यापैकी एक आता शिंदे गटात गेला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस कुठे आहे हे शोधले पाहिजे.”

Maharashtra Political:बच्चू कडू यांनी हा प्रकार करून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष वेधले.i

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here