
Buldhana Farmer Suicide :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात होली सणाच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त केलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने पाण्याच्या चणचणीमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन उभारले होते.
बुलडाण्यातील रक्ताची होळी: शाळेतील विद्यार्थ्यांच्या ब्लेड हल्ल्याने खळबळ(Buldhananews)
कैलास नागरे यांनी शिवनी आरमाळ शिवारातील शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभारले होते. त्यांची मागणी होती की खडकपूर्णा धरणातून पाणी सोडून त्यांच्या पाटबंधारे विभागात पाणी पुरवले जावे.
शासकीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु मार्च महिन्यातही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच त्रागाने कैलास नागरे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
कैलास नागरे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, परंतु पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका.
मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो… स्वतः शून्य झालो.” या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Buldhana Farmer Suicide:शिवणी आरमाळ येथील ग्रामस्थांनी कैलास नागरे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला आहे. ते म्हणत आहेत की, “जोपर्यंत नागरे यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांचा मृतदेह हलवणार नाही.” या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे