
Buldhananews:बुलडाण्यातील भादोला येथील जिल्हा परिषदेच्या एका उच्च प्राथमिक शाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे.
येथे पाचवीच्या 11 विद्यार्थ्यांनी “तुला शपथ आहे” म्हणत एकमेकांच्या हातावर ब्लेड मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळा बंद करून आंदोलन केले आहे.
या शाळेत एकूण 11 शिक्षक आणि 198 विद्यार्थी आहेत. पालकांचा आरोप आहे की शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असतात. या घटनेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी जखमी झाले आहेत,
पण सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार केले गेले आहेत. पालकांनी शिक्षकांविरोधात अनेकवेळा तक्रारी केल्या असताना, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.
या घटनेनंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी एका शिक्षकाची तात्काळ बदली केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Buldhananews :पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद करून आंदोलन केले आहे. या घटनेमुळे शाळेतील सुरक्षा आणि शिक्षकांच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.