महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल: हर्षवर्धन सपकाळ यांची टीका (Harshvarrdhan Sapkal)

 

Harshvarrdhan Sapkal:अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना सत्तेसाठी हापापलेले असल्याचा आरोप केला. सपकाळ म्हणाले की महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही आणि ते केवळ सत्तेसाठीच एकत्रित आहेत.

त्यांनी सरकारला समाजवादी विचार मान्य नसल्याचे सांगितले आणि संविधानाच्या विरोधात काम करण्याचा आरोप केला.

सपकाळ यांनी राज्यातील जनतेला फोडा आणि राज्य करा या ब्रिटीश धोरणाची पुनरावृत्ती होत आहे असे म्हटले. त्यांनी कोयता गॅंग, आका यांसारख्या गटांच्या उदयाचा परिणाम म्हणून सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवले.

Harshvarrdhan Sapkal:सपकाळ म्हणाले की काँग्रेस सत्तेसाठी हापापलेली नाही, ती विचारांसाठी आहे. त्यांनी राज्यभर जागर यात्रा काढण्याची घोषणा केली आणि जनतेच्या प्रश्नांची दखल घेण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here