मुख्य बातमी: महायुतीच्या तीन आमदारांना न्यायालयाची नोटीस (High Court )

 

High Court:नागपूर खंडपीठातील मुंबई उच्च न्यायालयाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस विदर्भातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकांवर दिली आहे.

भाजपचे प्रताप अडसड, संजय कुटे आणि शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्याविरुद्ध हे प्रकरण आहे. या याचिकांमध्ये निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या वापरासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा आरोप आहे.

आईच्या हातातून सात वर्षाच्या मुलाला ओढून नेत बिबट्याने केले ठार किनगाव-साकळी शेत शिवारातील घटना ( Brekingnews )

निवडणूक याचिका: महाविकास आघाडीच्या विदर्भातील अनेक पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या याचिका दाखल केल्या आहेत.

आरोप: ईव्हीएमच्या वापरासाठी अधिसूचना न काढणे, पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज आणि फॉर्म नंबर 17 न देणे, व्हीव्हीपॅटची मोजणी न करणे यावर आरोप आहेत.

 

न्यायालयाचा आदेश: न्यायालयाने केवळ विजयी उमेदवारांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.

वकील: या प्रकरणात ॲड. आकाश मून, ॲड. पवन डहाट आणि ॲड. ऋग्वेद ढोरे यांनी बाजू मांडली आहे.

High Court:विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या विजयावर शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here