महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; घरगुती सिलेंडरच्या किमती कायम(LPG Gas)

 

LPG Gas::एक मार्च 2025 रोजी, देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे.

यावेळी फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र कायम राहिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( Viral Video )

एक मार्च 2025 रोजी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1,803 रुपयांना मिळेल, जो फेब्रुवारीमध्ये 1,797 रुपयांना मिळत होता.

कोलकाता येथे त्याची किंमत 1,913 रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये 1,907 रुपये होती. मुंबईत हा सिलिंडर आता 1,755.50 रुपयांना मिळणार आहे, जो फेब्रुवारीमध्ये 1,749.50 रुपयांना मिळत होता.

कोलकातामध्ये 19 किलोच्या निळ्या सिलेंडरची किंमत 1,965.50 रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये 1,959.50 रुपये होती. चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,918 रुपये झाली आहे.

महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; घरगुती सिलेंडरच्या किमती कायम(LPG Gas)

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

LPG Gas:14 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र ऑगस्ट 2024 पासून कायम आहेत. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 802.50 रुपयांना, दिल्लीत 803 रुपयांना, लखनऊमध्ये 840.50 रुपयांना, कोलकत्तामध्ये 829 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 815.50 रुपयांना मिळतोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here