पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रूप समोर ( pune swargate Crime )

 

pune swargate Crime:पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असून, त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांवर जबरी लुटीचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. दत्तात्रय गाडे हा पुण्यातील एका मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता, ही माहितीही समोर आली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार केला असता, गाडे वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

पुणे स्वारगेटच्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या प्रकरणात पीडितेच्या मदतीला कोणीच आले नाही.

पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रूप समोर ( pune swargate Crime )

यावरून सामाजिक संवेदनशीलतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दत्तात्रय गाडे हा झटपट पैसे कमविण्याच्या मोहात गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

pune swargate Crime:तो बस स्थानकावर पोलीस म्हणून ओळख करून देत असे, ही माहितीही समोर आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here