माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी डॉ. गोपाल बछिरेंचे नगरपालिकेत ठीया आंदोलन ( andolannews )
लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर
andolannews:मेहकर नगरपालिकेच्या चापलुसी कारभारामुळे लोक त्रस्त आहेत माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी व डॉ. गोपाल बाछिरे यांनी नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या दालनातच ठीया आंदोलन करून मुख्याधिकाऱ्याला जाब विचारला.
नगरपालिका मेहकर हत्तीतील डीपी रोड वरील पथदिव्याचे खांब उठून फेकण्यात आले व एका लोकप्रतिनिधीचा तेथे आनंद उत्सव एक महिना पूर्वी साजरा करण्यात आला एक महिना होऊन सुद्धा सदरील खांब परत बसवण्यात आले नाही.
म्हणून काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदरील घटनेची तक्रार केली होती.
बिबी पोलीस स्टेशनची यशश्वि कामगीरी घरफोडीच्या आरोपीला अटक ( policenews )
जेव्हा आज नगरपालिकेत जाऊन माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी व डॉ. गोपाल बछिरे यांनी ठिया आंदोलन करून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना जाब विचारला आपण कोणत्या अधिकारात वैयक्तिक कार्यक्रमासाठी डीपी रोडवरील खंबे काढून लोकप्रतिनिधीस आनंद उत्सव कार्यक्रमासाठी परवानगी दिली .
त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप सदरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला हस्तांतरित केलेलं नाही असे उत्तर दिले त्यावर बछिरे यांनी जेव्हा तुमच्याकडे रस्ता हस्तांतरित झालाच नाही.
मग कुठल्या अधिकाऱ्याने त्या रस्त्यावर तुम्ही पथदिव्याचे खांब लावले तेव्हा मुख्याधिकारी गांगरून गेले त्यावर मुख्य अधिकाऱ्यांना डॉ. बछिरे यांनी तुम्ही राजकारण्यांचे घरगडी आहात का असा प्रश्न केला सर्वसामान्यांच्या टॅक्स रुपी भरलेल्या रकमेतून तुम्हाला पगार मिळतो.
मग तुम्ही राजकारण्यांचे घरगडी म्हणून का काम करता आपला व्यवहार सुधरून घ्या सर्वसामान्यांची जनतेचे काम करा अन्यथा जनतेस याचा हिशोब द्यावा लागेल असा दम माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्याधिकारी यांना दिला.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्याधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत व खुलासा लेखी स्वरुपात देऊन त्यानंतरच ठिय्या आंदोलन संपले
andolannews:-याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत मादनकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एड. मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.